नागपूरच्या प्रभाग 25 मध्ये शिवसेना महिला शाखेचे उत्साहात उद्घाटन.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित आणि बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व घराघरात पोहोचवणाऱ्या शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन पूर्व नागपुरात अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला, यानिमित्ताने महिला शाखेच्या रूपाने नवा उपक्रम नव्या उत्साहात सुरू झाला.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित आणि बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व घराघरात पोहोचवणाऱ्या शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन पूर्व नागपुरात अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने हिवरी नगर येथील शिवस्मारक व बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास शिवसेना सभा संघटक महेंद्र कठाणे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रभाग 24 मध्ये उपजिल्हाप्रमुख हरी बनाईत यांच्या नेतृत्वाखाली भारत नगर येथील उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्रावर पुष्पहार घालण्यात आला व मिठाई वाटप करण्यात आली. भांडेवाडी परिसरातील गिरिजा नगरमध्ये जिल्हा संघटक सुरेखा खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहरप्रमुख सौ. शारदा मेश्राम, शिवसेना सभा संघटक महेंद्र कठाणे, विभागप्रमुख श्रीमती रंजना राजपांडे यांच्या उपस्थितीत महिला आघाडी प्रभाग 25 शाखेचे उदघाटन करण्यात आले.
सौ. शारदा मेश्राम याचा पुढाकारूतून गिरीजा नगर प्रभाग 25 मध्ये शिवसेनेची महिला शाखा वर्धापन दिनाच्या निमित्ताने उघडण्यात आली. त्यांची शिवसेनेशी एकनिष्ठ असलेली रोखठोक पुढारी म्हणून ओळख वस्तीत आहे, सार्वजनिक आणि लोकहिताच्या कामात त्या नेहमी मदत करतात अशी एक प्रतिमा त्यांची वस्तीत आहे. नागरिकांनी त्यांचा या पुढाकाराने वस्तीचे निश्चित कल्याण होईल असा विश्वास दाखविला आहे.
एकजुटीने राहा, जाति आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे.
शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रभाग २५ मध्ये शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रामुख्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ बनाईत, राजेश राजपांडे, स्नेहा मेश्राम, पूजा आडीकने, मालती खडतकर, सुनीता शेंडे, सारिका मानवटकर, भाविका बांते, अश्विनी गजभिये, कल्पना मेश्राम, प्रियंका गरमडे, मंगला राणे, मंगेश मेश्राम, शुभम मेश्राम, जयपाल शेंडे, राजेश निबर्ते, अनिल पाल, पंकज दाणी, करण कुडे, युग आडीकने, तेजस मानवटकर, राहुल सेन, देवेंद्र राणे, स्वप्नील नंदरधने आदी उपस्थित होते. संचालन स्नेहा मेश्राम यांनी केले तर आभार शारदा मेश्राम यांनी मानले.